जालना फन रनर अँड रोट्रॅक्ट क्लबच्या हाफ मॅरेथॉनमध्ये महिला धावपटूची दमदार कामगिरी; अलका धांडेंचा दुसरा क्रमांक

महिला धावपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

Published By Shubh Prabhat
On

मागील वर्षी याच स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. यंदाही त्यांनी उत्तम कामगिरी करत आपली क्षमता सिद्ध केली. विशेष म्हणजे, कर्तव्य बजावत असतानाही आपला छंद त्यांनी जपला असून दररोज नियमितपणे धावण्याचा सराव करत असल्याचे त्यांनी नमूद केले. जालना शहरात धावण्याच्या संस्कृतीला चालना देण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त ठरत असून नवोदित धावपटूंना प्रेरणा मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. आयोजक संस्थेच्या वतीने भविष्यातही अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

जालना फन रनर अँड रो ट्रॅक्ट क्लबच्या वतीने आयोजित हाफ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. रविवार दि. 1 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या स्पर्धेत पंचेचाळीस वर्ष वयोगटात सहभागी झालेल्या अलका धांडे या महिला धावपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आज केवळ पदक प्रदान करण्यात आले असून रोख बक्षिसाची रक्कम संबंधितांकडून नंतर देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
ही हाफ मॅरेथॉन स्पर्धा विविध वयोगटांसाठी आयोजित करण्यात आली होती. पंचेचाळीस वयोगटात धाव घेतलेल्या या अनुभवी महिला धावपटू गेल्या सात ते आठ वर्षांपासून नियमितपणे धावण्याचा सराव करत आहेत. कोणतीही स्पर्धा असो, त्या सातत्याने सहभागी होत असून दरवर्षी मॅरेथॉनमध्ये धाव घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
मागील वर्षी याच स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. यंदाही त्यांनी उत्तम कामगिरी करत आपली क्षमता सिद्ध केली. विशेष म्हणजे, कर्तव्य बजावत असतानाही आपला छंद त्यांनी जपला असून दररोज नियमितपणे धावण्याचा सराव करत असल्याचे त्यांनी नमूद केले. जालना शहरात धावण्याच्या संस्कृतीला चालना देण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त ठरत असून नवोदित धावपटूंना प्रेरणा मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. आयोजक संस्थेच्या वतीने भविष्यातही अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

प्रतिनिधी

संबंधित समाचार

टॉप न्यूज