श्रीगोंद्यात राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत किंग इंग्लिश स्कूलचा दैदीप्यमान यश; प्रणिती गुंजाळ प्रथम

आगामी राष्ट्रीय स्पर्धेतही प्रणिती गुंजाळ उत्तम कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

On

श्रीगोंदा : श्रीगोंदा येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत किंग इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत प्रणिती गुंजाळ हिने प्रथम क्रमांक पटकावत शाळेच्या यशात मानाचा शिरपेच रोवला. तसेच खुशी पाल हिने द्वितीय क्रमांक तर ईश्वरी जाधव हिने तृतीय क्रमांक मिळवून शाळेच्या लौकिकात भर घातली.

प्रथम क्रमांक पटकावलेल्या प्रणिती गुंजाळ हिची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली असून, तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. या यशामागे मार्गदर्शक अशोक शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले.
या यशाबद्दल किंग इंग्लिश स्कूलचे शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी राष्ट्रीय स्पर्धेतही प्रणिती गुंजाळ उत्तम कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिनिधी

संबंधित समाचार

टॉप न्यूज