कलाकारांच्या सर्जनशीलतेला मिळणारे हे व्यासपीठ कौतुकास्पद” : मनीषाताई टोपे
जालना : चित्रकलेच्या विविध कलाविष्कारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या यशवंतराव चव्हाण सेंटर जालना, अजिंठा चित्रकला महाविद्यालय व रोटरी क्लब जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मान्सून शो–२०२६’ या ३३व्या राज्यस्तरीय कला प्रदर्शनाला श्रीमती मनीषा ताई टोपे यांनी भेट देऊन कलाकारांच्या कलाकृतींची पाहणी केली. यावेळी त्यांनी कलाकारांचे कौतुक करत, जालना नगरीत अशा प्रकारचे राज्यस्तरीय कला उपक्रम आयोजित होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
आज प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन कलाकृतींचा आस्वाद घेतला. विविध माध्यमांतील चित्रे, कलाविष्कार आणि कलाकारांची सर्जनशीलता पाहून विद्यार्थी व कला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
तसेच अजिंक्य भैय्या टोपे यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील छायाचित्रांचेही प्रदर्शनात विशेष कौतुक होत आहे. त्यांच्या छायाचित्रांमधील विषयवैविध्य, कलात्मकता आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची मांडणी कला रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे. या छायाचित्रांमुळे प्रदर्शनाला वैविध्यपूर्ण आणि व्यापक कलादृष्टी प्राप्त झाली असल्याचे मतही व्यक्त होत आहे.
कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेला चालना देणारे असे उपक्रम जालना शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारे असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.
या प्रसंगी प्रा. डॉ. रावसाहेब ढवळे, श्री प्रशांत महाजन, श्री सचिन मुंदडा, प्राचार्य शहा सर, सुनील सोलाट, प्राचार्य दादासाहेब गजहंस, संजय पाटील, प्रा. सुजाता देवरे, प्रा. रणजित बायस, प्रा. डॉ. रविकिरण भुतेकर, प्रा. शंकर वैद्य, प्रा. दत्तात्रय देशमुख सर, प्रा. शंकर तिकांडे, प्रा. स्वप्नील रगडे यांच्यासह कला क्षेत्रातील मान्यवर, कलाकार, विद्यार्थी व कला रसिक उपस्थित होते.

Help