बाजीउमरद येथे अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते बैलांची विधीवत पूजा
बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला ‘खांदे मळणी’ कार्यक्रम उत्साहात
Published By Dainik Shubh Prabhat
On
जालना : महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीत शेतकरी आणि बैल यांचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे मानले जाते. शेतकऱ्याच्या सुख-दुःखात साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा बैलपोळा सणाच्या पूर्वसंध्येला जालना तालुक्यातील बाजीउमरद येथे पारंपरिक पद्धतीने ‘खांदे मळणी’ कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी उपस्थित राहून बैलांची विधीवत पूजा केली. बैलांना सजवून त्यांची पूजा-अर्चा करण्यात आली. त्यांच्या कपाळावर कुंकू-हळदीचा टिळा लावून औक्षण करण्यात आले. तसेच बैलांच्या खांद्यांची मळणी करून त्यांना नैवेद्य दाखविण्यात आला. यावेळी शेतकरी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने बैलांप्रती आपला आदर व कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमास बबनराव डोंगरे, एकनाथ इंगळे, गोवर्धन डोंगरे, बालाजी डोंगरे, सोपान डोंगरे, सदाशिव डोंगरे, विशाल डोंगरे, सतीश डोंगरे यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Help