कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठी देवमूर्ती येथे विशेष मार्गदर्शन व अर्ज स्वीकृती शिबिर
वंशावळ, महसुली पुरावे व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन; गुरुवारी सकाळी १० वाजता शिबिर
Published By Dainik Shubh Prabhat
On
देवमूर्ती, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या मार्गदर्शनाखाली कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठी विशेष मार्गदर्शन व अर्ज स्वीकृती शिबिराचे आयोजन देवमूर्ती येथे करण्यात आले आहे. गुरुवार, दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजता ग्रामपंचायत कार्यालय, देवमूर्ती येथे हे शिबिर होणार असून परिसरातील नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामीण महसूल मंडळ देवमूर्तीच्या वतीने करण्यात आले आहे.
ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. याशिवाय विहित नमुन्यातील स्वयंघोषणापत्र व शपथपत्रही आवश्यक राहणार आहे.
कागदपत्रांच्या अभावामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठीची प्रक्रिया सुलभ व्हावी, या उद्देशाने हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. देवमूर्ती महसूल मंडळातील पात्र नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहून पुराव्यासहित अर्ज सादर करावा आणि शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामीण महसूल मंडळ देवमूर्ती, ता. जि. जालना यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Help