चंदनझिरा  सुंदरनगर नागेवाडी येथे शासकीय रुग्णालय उभारणीसाठी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केली जागेची पाहणी

आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला गती

Published By Dainik Shubh Prabhat
On

जालना : चंदनझिरा परिसरातील सुंदरनगर नागेवाडी येथे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासकीय रुग्णालय उभारण्यात यावे, यासाठी शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. या पार्श्वभूमीवर आज आमदार अर्जुनराव खोतकर यांनी प्रस्तावित शासकीय रुग्णालयासाठीच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली.

चंदनझिरा परिसराचा वाढता विस्तार, वाढती लोकसंख्या तसेच परिसरातील नागरिकांची आरोग्य सुविधांसाठी होणारी गैरसोय लक्षात घेता सुंदरनगर नागेवाडी येथे शासकीय आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत आमदार खोतकर यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याचाच एक भाग म्हणून आज प्रस्तावित जागेची पाहणी करण्यात आली. हे आरोग्य अभियान अंतर्गत निधी मंजुरीनंतर जागेचा प्रश्नही आमदार खोतकर यांनी सोडवला यापूर्वी आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या प्रयत्नातून नागरी NRHM मधुन प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, महानगरपालिकेच्या स्तरावरील उदासीनतेमुळे मंजूर झालेला निधी शासनाकडे परत करण्याची नामुष्की मनपावर आली होती. त्यानंतरही आमदार खोतकर यांनी हा विषय सोडून न देता पुन्हा पाठपुरावा करून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधी मंजूर करून आणला.

निधी मंजूर झाल्यानंतर आरोग्य केंद्रासाठी आवश्यक असलेल्या जागेचा प्रश्नही निर्माण झाला होता. आमदार खोतकर यांनी या प्रश्नात स्वतः जातीने लक्ष घालून जागेची अडचण दूर करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आता आरोग्य केंद्राच्या कामाला पुढील गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Indian_Fast

चंदनझिरा, नागेवाडी, आयेशानगर, एमआयडीसी परिसराला लाभ

सुंदरनगर नागेवाडी येथे शासकीय आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्यानंतर चंदनझिरा, नागेवाडी, आयेशानगर, एमआयडीसी तसेच लगतच्या परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. स्थानिक पातळीवरच प्राथमिक तसेच आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, उपचारासाठी नागरिकांना दूरवर जाण्याची गरज कमी होणार आहे.

आज झालेल्या पाहणीदरम्यान आमदार अर्जुनराव खोतकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रस्तावित जागेबाबत माहिती घेतली. आरोग्य केंद्राच्या उभारणीसाठी आवश्यक बाबी, जागेची उपलब्धता आणि पुढील कार्यवाही याबाबतही चर्चा करण्यात आली.

दरम्यान, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत (NRHM )आरोग्य केंद्रासाठी 0निधी मंजूर करून आणण्यापासून ते जागेची अडचण दूर करण्यापर्यंत आमदार खोतकर यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. परिसरातील नागरिकांचा आरोग्य सेवेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल नागरिकांनी आमदार अर्जुनराव खोतकर यांचे मनःपूर्वक आभार मानले.

या पाहणीप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाचफुले, जालना जिल्हा शल्यचिकित्सक (CS) डॉ. राजेंद्र पाटील, विठ्ठल  दैने, संतोष रासवे, राधा किसान दाभाडे, नगरसेवक सुनील बोर्डे, नगरसेवक माजीद पठाण, नगरसेवक अनिल तिरुखे, आनंद धोत्रे यांच्यासह परिसरातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

प्रतिनिधी

संबंधित समाचार