पिंप्री राजा येथे गणपती मिरवणुकीत ट्रेलर घुसला; दोघांचा मृत्यू, १० ते १५ जण जखमी
ब्रेक फेल झाल्याने ट्रेलरचा ताबा सुटल्याची प्राथमिक माहिती; घटनास्थळी पोलिसांचे मदतकार्य सुरू
Published By Dainik Shubh Prabhat
On
जालना/पिंप्री राजा, दि. १४ सप्टेंबर : गणेशोत्सवाच्या उत्साहाला गालबोट लावणारी दुर्दैवी घटना पिंप्री राजा येथे घडली. गणपती आगमनाच्या मिरवणुकीदरम्यान एका ट्रेलरचे ब्रेक फेल झाल्याने त्याचा ताबा सुटून ट्रेलर मिरवणुकीत घुसल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून, १० ते १५ जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, बिट जमादार जयसिंग नागलोत यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्याचे काम सुरू करण्यात आले.

Help