मान्सूनपूर्व तयारीसाठी मोती तलाव येथे आपदा मित्रांना आपत्ती व्यवस्थापन व पूर बचाव प्रशिक्षण; पथकाला साहित्याचे वाटप

जालना मनपाचा उपक्रम

Published By Dainik Shubh Prabhat
On

आपत्तीच्या काळात वापरण्यात येणार्‍या विविध बचाव साहित्याची माहिती, त्यांचा वापर, सुरक्षितता उपाययोजना तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले असून आपदा मित्र स्वयंसेवक पथकाला बचावासाठी लागणार्‍या साहित्याचे वाटपही करण्यात आले.

 प्रशिक्षणामध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 26 ‘आपदा मित्र’ स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला. यावेळी जल बचाव व पूर परिस्थितीत वापरण्यात येणारी इन्फ्लेटेबल रेस्क्यू बोट, मोटर बोट इंजिन, लाईफ जॅकेट, लाईफ बॉय, रेस्क्यू रोप, फ्लोटिंग पंप, पोर्टेबल पंप तसेच सर्च व फ्लड लाईट यांची माहिती देण्यात आली.

तसेच हेल्मेट, सेफ्टी ग्लोव्हज, रेन प्रोटेक्शन साहित्य, फर्स्ट एड किट आणि स्ट्रेचर यांसारख्या आपत्कालीन संरक्षक साहित्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. इमारत दुर्घटनेतील बचाव कार्यासाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रिक बोल्ट कटर, हायड्रॉलिक कटर, स्प्रेडर, कंक्रीट ब्रेकर, रेस्क्यू कटिंग टूल्स, लोखंड कापण्याची साधने, क्रोबार, हातोडे, फावडे व रेस्क्यू लाईटिंग उपकरणांचीही माहिती देण्यात आली.

प्रतिनिधी