बसस्थानकासमोरील वैष्णवी लॉजवर पोलिसांचा छापा; देहविक्री प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा
पोनि. भारती यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी न्यू वैष्णवी लॉजच्या पहिल्या मजल्यावर छापा टाकला.
Published By Shubh Prabhat
On
जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत बसस्थानकासमोरील न्यू वैष्णवी लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित देहविक्री व्यवसायावर पोलिसांनी धडक कारवाई करत पाच जणांविरुद्ध सदरबाजार पोलीसांनी कारवाई केली आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक तेघबीर सिंह संधु तसेच अप्पर पोलीस अधिक्षक विक्रम साळी यांच्या आदेशानुसार सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. पोनि. भारती यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी न्यू वैष्णवी लॉजच्या पहिल्या मजल्यावर छापा टाकला.
या प्रकरणी कैलास रतनलाल कुम्हार रा. चित्तोडगड, राजस्थान, सध्या न्यू वैष्णवी लॉज, जालना, करण रवि वाहुळे रा. जामवाडी, जालना, नारायण रामेश्वर सेन रा. उडवागाव, चित्तोडगड, राजस्थान, स्वप्नील मधुकर खेडकर रा. रुमणा चांगेफळ, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा तसेच रुषीकेश रामकिसन जायभाये रा. रुमणा चांगेफळ, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाईत सपोनी. आनंदसिंग साबळे, सपोनी. अविनाश गडाख, पोहेकॉ. कोकणे, बाबा हरणे, रामप्रसाद रंगे, विनोद निकम, संतोष जाधव, कारभारी जारवाल, शिवकन्या मगर तसेच नसीम पठाण यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ. संतोष जाधव करीत आहेत.


