नंदापूर ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी
डिजेला नाकारत टाळ मृदंगाच्या गजरामध्ये काढली मिरवणूक
Published By Dainik Shubh Prabhat
On
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांच्या पूर्णकृती पुतळ्यास अभिवादन
जालना प्रतिनिधी : प्रजेच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त जालना तालुक्यातील नंदापूर ग्रामपंचायत कार्यालयात (दि. 31) रोजी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात जेष्ठ नागरिक सुखदेव चांदगुडे, भरत उबाळे यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या लोककल्याणकारी विचारांना उजाळा दिला.
जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच दत्तु कुरधने यांची उपस्थित होती. याप्रसंगी भरत उबाळे यांनी बोलताना सांगितले की, अहिल्याबाई होळकर यांचे कार्य केवळ एका काळापुरते मर्यादित नसून, त्यांचे कुशल प्रशासन, न्यायव्यवस्था आणि समाजकल्याण आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या अभिवादन कार्यक्रमास माजी उपसरपंच रामदास खरात, ऋषींदर कुरधने, सुखदेव चादगुडे, भरत उबाळे, रोजगार सेवक रविंद्र उबाळे, दादाराव कुरधने, राहुल खरात, सखाराम उबाळे, अर्जुन उबाळे, कर्मचारी गजानन कुरधने, रावसाहेब कुरधने, अंकुश कुरधने, श्री कुरधने आदीसह अनेकांची उपस्थिती होती.
तर सायंकाळी ६ वा. दरम्यान टाळ मृदंगाच्या गजरामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य अशी गावातून मिरवणूक काढत अनोखा पध्दतीने जयंती साजरी केली.


