औद्योगीक वसाहत भागात दहशत माजवणार्या दोघांना अटक; 2 खंजर जप्त; चंदनझीरा पोलीसांची कारवाई
ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली करण्यात आली.
Published By Shubh Prabhat
On
जालना औद्योगीक परिसरात अवैधरित्या धारदार शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणार्या दोन युवकांना चंदनझिरा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून दोन धारदार खंजर जप्त करण्यात आले आहेत.
एमआयडीसी भागात दोन युवक धारदार शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेनुसार पोलिसांचे पथक तात्काळ एमआयडीसी परिसरातील स्वराज पार्किंगसमोरील रस्त्यावर पोहोचले. तेथे संशयित युवकांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्या जवळून दोन धारदार खंजर आढळून आले.


