चार महिन्यांपासून फरार असलेला अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
दीपक राजू जाधव (वय 25, रा. माळशेंद्रा, ता. जि. जालना) याने फूस लावून पळवून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
जालना, दि. 29 : चंदनझिरा पोलीस ठाणे हद्दीतील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी चार महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून पीडित मुलीचीही सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खादगाव (ता. बदनापूर) येथील 39 वर्षीय महिलेने 5 फेब्रुवारी 2026 रोजी चंदनझिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या अल्पवयीन मुलीस दीपक राजू जाधव (वय 25, रा. माळशेंद्रा, ता. जि. जालना) याने फूस लावून पळवून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. त्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक 46/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 137(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
https://www.instagram.com/reel/DY6bKPaIpTQ/?utm_source=ig_web_copy_link&igsh=NTc4MTIwNjQ2YQ==
यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी व पीडितेचा शोध सुरू केला. तपासादरम्यान दोघेही वाळूज परिसरातील राजणगाव येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने माऊलीनगर, कमळापूर, राजणगाव (ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे छापा टाकून आरोपी व पीडित मुलगी यांना ताब्यात घेतले
पीडित मुलीची ओळख पटवून दोघांनाही पुढील तपासासाठी जालना येथे आणण्यात आले असून चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्यासह पोलीस अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, प्रशांत लोखंडे, रेणुका बांडे, सौरभ मुळे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार संदीप मांटे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.


