सावरकरांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज : धनसिंह सुर्यवंशी
युवकांनी वाचन, चिंतन आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव जपणे आवश्यक असल्याचे आवाहन त्यांनी केले.
Published By Shubh Prabhat
On
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारकांनी मोठे योगदान दिले असून त्यांच्या त्याग, बलिदान आणि संघर्षाचा इतिहास समाजापर्यंत योग्य प्रकारे पोहोसावरकरांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन हिंदुमहासभेचे नेते धनसिंह सुर्यवंशी यांनी केले.
ब्राह्मण सभा भवन येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दोन जन्मठेपांची शिक्षा भोगली, काळ्या पाण्याची शिक्षा सहन केली आणि स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष केला. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, राणी लक्ष्मीबाई, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच लहुजी साळवे यांसारख्या क्रांतीवीरांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मुकुंद कुलकर्णी यांनी केले. यावेळी आर. आर. जोशी, रवींद्र देशपांडे, श्रीकांत शेलगांवकर, डॉ. संजय रूईखेडकर, संतोष दाणी, डॉ. पद्माकर सबनीस, शिवाजी जोशी, अतुल हेलसकर, संजय देशपांडे, नितीन दंडनाईक यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.


