6 घरफोडीचे गुन्हे उघड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 3 आरोपी जेरबंद; 1 लाख 19 हजाराचा मुद्देमाल जप्त

घरफोडी करणार्‍या आरोपींचा शोध घेऊन वलीमामू दर्गा परिसरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले.

Published By Shubh Prabhat
On

जालना जिल्ह्यातील चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 6 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले असून, घरफोडी करणारे 2 आरोपी तसेच चोरीचा माल खरेदी करणारा 1 आरोपी यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण 1 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांनी चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव व त्यांच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी चोरी व घरफोडी करणार्‍या आरोपींचा शोध घेऊन वलीमामू दर्गा परिसरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी रंगनाथनगर येथील घरफोडीची कबुली दिली. त्यानंतर अधिक चौकशी केली असता त्यांनी आणखी काही घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली देत चोरीचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला.

या कारवाईत तालुका जालना पोलीस ठाणे हद्दीतील रंगनाथनगर, सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील व्यंकटेशनगर, बालाजीनगर, श्रीकृष्णनगर, धनलक्ष्मी बिकानेर स्वीट, भोकरदन नाका येथील घरफोडी तसेच जिजामाता कॉलनी येथील घरफोडीचे गुन्हे उघड करण्यात आले.

Indian_Fast

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुंदरसिंग सुखुसिंग राजपुत रा. वलीमामू दर्गा, जालना, लाजरस शांतीलाल मिसाळ रा. वलीमामू दर्गा, जालना आणि मनोज कलाजी धानुरे रा. दर्गावेस काद्राबाद, जालना यांचा समावेश आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि. सचिन खामगळ, पोउपनि राजेंद्र वाघ तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला.

प्रतिनिधी

संबंधित समाचार