बकरी ईदपूर्वी कदीम जालना पोलिसांची मोठी कारवाई; कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 20 बैलांची सुटका
या प्रकरणात शेख जुबेर शेख फिरोज व ग्यासोददीन कमरोददीन कुरेशी, दोघेही रा. मोरंडी मोहल्ला, जुना जालना यांचा समावेश आहे.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कत्तलीसाठी निर्दयतेने डांबून ठेवण्यात आलेल्या 20 गोवंशीय जनावरांची कदीम जालना पोलिसांनी धडक कारवाई करत सुटका केली. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे 6 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. 26 मे 2026 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मोरंडी मोहल्ला, जुना जालना येथे मुजम्मील व गफार कुरेशी यांच्या वाड्यात गोवंशीय जनावरे विनापरवाना कत्तलीसाठी कोंबून ठेवण्यात आल्याची खात्रीशीर माहिती कदीम जालना पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोनि. जे. बी. शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने रात्री सुमारे 1.30 वाजता दोन पंचांसह मोरंडी मोहल्ला परिसरात छापा टाकला.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक तेघबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधिक्षक विक्रम साळी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सपोनि. अविनाश गडाख, सपोनि. अमित मस्के, सफौ. बरडे, सफौ. खरात, पोहेकॉ. कोकणे, सदा राठोड, उरफाटे, पोना. बाबा गायकवाड, ताहेर शेख तसेच पोकॉ. सदाशीव मुटकुळे यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास मपोहेकॉ. प्रतिभा पंडुरे करीत आहेत.


